आज काहीतरी मोठं होणार आहे – इस्रायल व इराण संघर्ष भीषण वळणावर
दोन्ही देशांनी अस्तित्वाची लढाई सुरु केली असून एकमेकांवर हल्ले व प्रतिहल्ले सुरु झाले आहेत. इस्रायलने याअगोदरच नागरिकांना तेहरान सोडण्याचे आदेश दिले आहेत. मोसादकडून अचूक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.
बर्याच आघाडीच्या अधिकाऱ्यांना नियोजनपूर्वक लक्ष्य करण्यात आलं आहे. जीवनावश्यक पाण्याच्या स्त्रोतांवर हल्ले झाल्याने इराणची राजधानी तेहरानमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, इराणने “आर या पार” भूमिका घेतल्याचा इशारा इस्रायलला दिला आहे.

सध्या संघर्ष तीव्र टप्प्यावर आहे. या संघर्षामुळे जागतिक तणाव निर्माण झाला आहे आणि भारतावरही त्याचे पडसाद उमटत आहेत. इराणमध्ये सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी अडकले असून भारतीय दूतावास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न करत आहे. अझरबैझानच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना सीमारेषेवरून बाहेर काढण्यात आले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून युद्धविराम मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकंदरीत युद्धस्थिती पाहता त्यांची सहनशक्ती संपत चालली आहे.
या संघर्षामुळे जागतिक बाजार अस्थिर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतात पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईत वाढ होऊ शकते. याचसोबत, भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स तब्बल ८५० अंकांनी खाली आला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.