कल्याण : कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व ऑटो रिक्षा वाहनांवर नवीन भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या नव्या निर्देशांनुसार, सदर भाडेवाढ १ जुलै २०२५ पासून अंमलात येणार आहे.

भाडेवाढीच्या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांवर काही प्रमाणात आर्थिक भार वाढणार असला, तरी रिक्षाचालकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, वाहन देखभाल खर्च आणि विमा हप्ते वाढल्याने भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे आरटीओ विभागाने स्पष्ट केले.

नवीन दरानुसार,
➡️ किमान प्रारंभिक भाडे ₹२१ वरून आता ₹२५ करण्यात आले आहे.
➡️ त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे ₹१४ ऐवजी ₹१६ आकारले जाणार आहे.

रिक्षा युनियनने या निर्णयाचे स्वागत केले असून, प्रवाशांमध्ये मात्र संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काही प्रवाशांनी राज्य शासनाकडे प्रवासी अनुदान योजनाही राबवावी, अशी मागणी केली आहे.

➡️ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, भाडेवाढीचा फेरआढावा तीन महिन्यांनंतर घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *